शिरुरः येथील कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची हृदय पिळवटून टाकण्यारी घटना घडली आहे. नराधम बाप हा ११ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. मुलीने हा संपूर्ण प्रकार मोठ्या भावला सांगितल्यानंतर उघडकीस आला आहे. पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली असून, आरोपी विरुद्ध पोक्सो तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईच्या मैत्रीनीने हा प्रकार रांजणगाव MIDC पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करीत नराधम बापाला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम येथून एक कुटुंब कारेगाव येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते. पिडीत मुलीचा बाप हा बाहेरख्याली असल्यामुळे तीन वर्षांपूर्वी आपल्या दोन मुलांना टाकून निघुन गेली. त्यानंतर बापाने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या बाईशी अनैतिक संबंध ठेवले. परंतू, आठ दिवसांपूर्वी आरोपीच्या वागण्याला कंटाळून दुसरी बायकोही त्याला सोडून निघून गेली.
पीडितेची प्रकृती स्थिर
नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षीय मुलीसोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले. त्याच्या यातना सहन न झाल्याने मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठ्या भावाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर भावाने शेजारील व्यक्तीच्या मोबाईलवरुन आपल्या आईला फोन करुन ही सगळी घटना सांगितली. त्यानंतर तिने कारेगाव येथील आपल्या मैत्रिणीला तातडीने फोन करुन हि घटना सांगितली. तिच्या मैत्रिणीने लगेचच पीडित मुलीच्या घरी धाव घेतली आणि रांजणगाव MIDC पोलिसांशी संपर्क साधला. रांजणगाव पोलिसांनी पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर आणि त्यानंतर पुणे येथील शासकीय रुग्णालयात नेले. पिडीत मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
न्यायालयाने सुनावली आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी
रांजणगाव पोलिसांनी नराधम बापाला पुणे येथील विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालायने आरोपीला आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. कारेगाव येथील घटनास्थळी शिरुरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, अभिमान कोळेकर, महिला पोलिस हवालदार विद्या बनकर यांच्या पथकाने हि कारवाई केली असून, या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सविता काळे या करीत आहेत.