पुणेः आगामी विधान सभेच्या निवडणुकीसाठी राज्यात अनेक पक्ष आता चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहिला मिळत आहेत. त्यादृष्टीने आपल्या पक्षांच्या संभाव्य उमेदवारांसर्दभात चाचपणी देखील सुरू झाली आहे. तसेच कार्यकर्त्यांची मोट बांधली जात आहेत. याच धर्तीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे शिवसंकल्प मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पुणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) पक्ष प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याची ताकद असल्याचा विश्वास खा. संजय राऊत यांनी व्यक्त करीत नावांची यादी तयार असल्याचे सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये दुसऱ्याच्या पालख्या तुम्ही वाहल्या, आता स्वःतासाठी आणि पक्षासाठी लढण्याची तयारी शिवसैनिकांनी करायला हवी, असे आवाहन येथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना राऊत यांनी केले. तसेच आपण महाविकास आघाडीमध्ये असलो, म्हणून काय झाले राज्यातील अनेकांची पसंती ही “उध्दव ठाकरे” असतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसैनिकांनी खूप मेहनत घेतली, पण काही ठिकाणी आपण गाफिल राहिलो म्हणून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिली.
उद्याच्या विधानसभेची लढाई ‘आरपारची’ असणार आहे. त्यामुळे लोकसभेत काही ठिकाणी आपण गाहिल राहिलो आता विधानसभेसाठी गाफिल राहता कामा नये, असे आवाहन राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच केदारानाथ मंदीरातील पाचशे किलो सोनं कुठे गेलं? असा सवाल त्यांनी उपस्थित करून त्याची चौकशी करण्याची मागणी केली. उद्या म्हणजेच ५ आॅगस्टला जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून ५ वर्ष पूर्ण होतील, तेथील हिंदू पंडीतासाठी भाजपने काय केलं, असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. यामुळे राज्यातील २८८ जागांपैकी किमान १६० जागा आपण जिंकू असे वातावरण शिवसेनेला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.