शिरवळ, १ नोव्हेंबर – सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात धनगरवाडी येथील नामांकित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ९ लाख २० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३१ ऑक्टोबरच्या रात्री छापा टाकत ४५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.
धनगरवाडीतील एका पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये गुप्त माहितीच्या आधारे जुगार खेळला जात असल्याचा शोध घेत, शिरवळ व भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने कारवाईसाठी दाखल झाले. छापेमारीच्या वेळी ४३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रमजान उर्फ मुन्ना गणीभाई शेख (रा. शिरवळ ता. खंडाळा, जुगार अड्डा चालक), रमेश बाबासो मोटे रा. धनगरवाडी ता. खंडाळा जि.सातारा (जागा पोल्ट्री शेड मालक), विठ्ठल भिकोबा धुमाळ (रा. जोगवडे ता. भोर जि.पुणे), राहुल सिध्दराम गौडगाव (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), विशाल भारत नगरे (रा. सासवड ता. पुरंदर जि.पुणे), आकाश संजय जगताप (रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे), विजय पांडुरंग भंडलकर (रा. बाठार कॉलनी ता. खंडाळा जि.सातारा),तानाजी शामराव कोळपे (रा. सालपे ता. फलटण जि. सातारा), आप्पासो लालासो सालगुडे (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), लक्ष्मण गणपत गोफणे (रा. मासाळवाडी ता. बारामती जि. पुणे), चंदन अशोक काकडे (रा. कोळकी मालोजीनगर फलटण), अनिश शमशुद्दीन खान (रा. आझादगल्ली शिस्वळ ता. खंडाळा जि. सातारा), सोमनाथ बाळासो जाधव (रा. केळवडे ता. भोर जि. सातारा), सुभाष गणपत गायकवाड (रा.डाणीकर कॉलनी कोथरूड पुणे), असिफ अफजल खान (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), अभयसिंह चंद्रकांत ननावरे (रा. शेडगेवाडी ता. खंडाळा जि.सातारा), प्रशांत रमेश जगताप (रा. लांडगे आळी सासवड ता. पुरंदर जि.पुणे), प्रकाश बचन राऊत (रा. पळशी ता. खंडाळा), बापू लक्ष्मण आगम (रा. शास्त्रीचीक लोणंद जि. सातारा), भुषन शिवाजी शिंदे (रा. सालपे ता. खंडाळा जि. सातारा), रोहित बाळू कुंभकर (रा. भेलकेवाडी ता. भोर जि. पुणे), स्वझील विनायक जगताप (रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे),महेंद्र विष्णू फडतरे (रा. बावडा ता. खंडाळा जि. सातारा), नंदु मनीराम जस्वाल (रा. कात्रज पुणे), तुकाराम साहेबराव दराडे (रा. स्वारगेट पुणे), ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (रा. सिंहगड रोड पुणे), गोरख वसंत कांबळे (रा.नारायणपुर ता. सासवड जि. पुणे), विलास सुरेश वैराट (रा. शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा),राजेंद्र उत्तम तावरे (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), वैभव विजय भुतकर, (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), शब्बीर गफार पठाण (रा. शिरवळ ता. सांडाळा जि. सातारा), शाहिन शीकत बागवान (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), मिलींद साहेबराव विहीळकर (रा. वाई ता. वाई जि. सातारा), सुर्यकांत हरीचंद्र साळुंखे (रा. सहयाद्री सिटी नसरापुर ता. भोर जि. पुणे), धर्मेंद्र थिसुलाल जैन (रा.भोर जि.पुणे), प्रकाश अशोक जाधव (रा.तानाजी चौक शिस्वळ ता. खंडाळा जि. सातारा), अविनाश भानुदास पेडकर (रा. दत्तनगर फलटण जि.सातारा), सुनिल किसन मुळीक (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), विकास संजय पवार (रा. सटवाई शिरवळ ता. खंडाळा), मयुर अशोक जाधव (रा.तानाजी चौक, शिस्वळ), ऋषीकेश बंडू पचार (रा. अंबिकामाता मंदिर शिरवळ), सुनिल ब्रदीनाथ सुर्यवंशी (रा. चिचवेवाडी ता. पुणे), अशोक सोपान चिकणे (रा. कन्हेरी ता. खंडाळा), सागर एकनाथ गायकवाड (रा. कोंढावळे ता. वेल्हा जि. पुणे), राम भुजूंग साठे (रा. बिबवेवाडी पुणे) यांचा समावेश आहे.
या कारवाईत पोलिसांनी जुगार साहित्य, विदेशी मद्य, रोख रक्कम, ६ चारचाकी आणि १४ दुचाकी वाहने, तसेच मोबाइल फोन जप्त केले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पुणे व सातारा जिल्ह्यातील विविध भागातील आरोपींचा समावेश आहे.
या कारवाईसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी आणि सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप जगताप व सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर यशस्वी कारवाईबद्दल सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.