शिरवळः (क्राईम स्टोरी)
येथील शिंदेवाडी या ठिकाणी असणाऱ्या हॅाटेलच्या मालकाला व मॅनेजरला एका शुल्लक कारणावरुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना दि. २० सप्टेंबर रोजी घडली असून, हॅाटेलच्या समोर वाद चालला होता. त्या ठिकाणी फिर्यादी जावून त्यांनी पुढे वाहन घेण्याची विनंती वाहन चालकाला केली. याचा राग अनावर झाल्याने हॅाटेलच्या मालकाला व बिअर शॅापी सांभाळणाऱ्या मॅनेजरला लाडकी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच हॅाटेल व बिअर शॅापची तोडफोड करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबरच्या दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे हॅाटेलमध्ये काम पाहत होते. यावेळी बिअर शॅापीचा मॅनेजर देखील तेथे होता. त्यांच्या हॅाटेलसमोरील जागेत एका टॅान्सपोर्टचे वाहन उभे करताना गावातील एका व्यक्तीशी भांडण व शिवीगाळ करण्यात येत होती. यावेळी हॅाटेलचे मालक तिथे गेले व त्यांनी वाहन चालकाला हॅाटेलच्या पार्किंगमधली जागा मोकळी करुन वाहन पुढे घेण्यास सांगितले. त्यावेळी वाहन चालकाने फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडणाला सुरुवात झाली याचा आवाज मॅनेजरला ऐकू गेल्यानंतर तो धावत तिथे आला. त्याने ही भांडणे मिटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहन पुढे घेऊन वाहन चालक व्यक्ती त्याच्या सोबत आणखी दोन साथदारांना घेऊन तिथे येऊन शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींनी त्याची समजूत काढून त्यास तिथून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हॅाटेलवर ‘तो’ परत आलाय
हॅाटेल मालक सगळे विसरुन आपल्या घरी निघून गेले. मात्र, पुढे असे काही होईल याची साधी कुणकुणही त्यांना नव्हती. अचानक फोन खणाणला आणि मालक हॅाटेलवर तो वाहन चालक आणि त्याच्यासोबत काही जण गाड्या घेऊन आले आहेत. यानंतर लागलीच हॅाटेल मालक हॅाटेच्या दिशेने निघाले. वाटेत १० ते १५ जण त्यांच्या दिशेने आले. त्यांनी पुढचा मागचा कोणत्याही विचार न करता हॅाकी स्टीक, दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच यावेळी एकाच्या हातात तलवारी सारखी वस्तू होती, असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. याला आता जीवेच मारून टाकू, अशी धमकी त्यातील एकाने दिली. ते जीवाच्या आकांताने पळू लागले. मारहाण झाल्याने ते त्याच अवस्थेत पळत असताना वाटेत एकाच्या सायकलवरून ते रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्या गळ्यातील चैन हातातील घड्याळ घहाळ झाले होते.
उपाचारासाठी मालकापाठोपाठ बार मॅनेजरही रुग्णालयात दाखल
फिर्यादी यांच्या उपचार सुरू असाताना त्या ठिकाणी बारचा मॅनेजरही जखमी अवस्थेत दाखल झाला. त्याला देखील याच टोळक्याने मारहाण केली. तसेच बार व हॅाटेलची तोडफोड केली असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास शिरवळ पोलीस करीत आहेत. ही घटना एका क्राईम थ्रीलर सिनेमा सारखी घडली असल्याचे दिसते.