शिरुरः पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम सभापती मंगलदास बांदल (MANGALDAS BANDAL) यांच्या पुणे शहरातील हडपसर व शिरुर येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकत कारवाई केली होती. दि. २० अॅागस्ट रोजी बांदल यांच्या दोन्ही निवास्थानी ईडीने रात्री उशिरापर्यंत कारवाई केली. तसेच बांधल यांना पुढील चौकशीसाठी ईडीने मुंबईत नेले. दि. २१ रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, बांदल यांना पुन्हा दि. २९ रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. यामुळे आठडभर त्यांचा मुक्काम ईडीच्या कस्टडीत असणार आहे.
या प्रकरणात बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल( REKHA BANDAL) व भाऊ प्रताप बांदल (PRATAP BANDAL) यांना देखील ईडीने दि. २२ रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी मंगलदास बांदल यांना २१ महिने तरुंगात काढावे लागले होते. याच प्रकरणात पुन्हा ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे.ज्यावेळी ईडीने त्यांच्या घरी छापा टाकला त्यावेळी ५ कोटी ६० लाख रुपयांची रोख रक्कम, अलिशान कार आणि १ कोटी किमतींचे मनगटी घड्याळे ईडीला कारवाईत मिळून आली आहेत.