शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख
करंदी ता. शिरुर येथील मार्केटयार्ड समोर असलेल्या एका पान शॅापमध्ये काही युवक दुचाकीवरुन पान खाण्यासाठी आले आणि पान विक्रेत्याचा आयफोन कंपनीचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहेेे.
रवींद्र केंदार यांच्या रॉयल पान शॉपवर तीन दुचाकीहून चार युवक आले, त्यांनी पान शॉपमधून पान घेतले. मात्र, पान शॉप चालक रवींद्र केदार यांचा आयफोन मोबाईल गुपचूप काढून घेत पोबारा केला आहे. याबाबत रवींद्र रामराव केदार वय २२ वर्षे रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. वारणी ता. शिरुर कासार जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी चार अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार रफिक शेख हे करत आहे.