भोरः राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि. १५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा पुणे महामार्गावरील कामथडी येथे रस्त्याने जात असताना पाठीमागून येत असलेल्या एसटी बसने धडक दिल्याने अपघात घडला असून, या अपघातामध्ये एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शिवाप्पा धुम्मा क्य वय ४६ रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. पुणे यांनी पोलिसांना फिर्यादी दिली असून, पोलिसांनी एसटी चालक नवनाथ गोविंद देशमुख विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक १५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या अपघातात जखमी सनम कुमार दिनेश सिंग वय ३३, पत्नी पुजा सिंग, मुलगा सेनक क्य ५ व मुलगी पकुडी वय ३ सर्व राहणार पळशी ता खंडाळा जि. सातारा हे गाडीवरुन सातारा पुणे हायवेने जात असताना कामथडी येथे असताना त्यांच्या गाडीस पाठीमागून आलेल्या एसटी बसने जोराची धडक दिली. या धडकेत मोटर सायकल वरील सनम कुमार दिनेश सिंग, रोनक जनन कुमार सिंग वय 5 वर्ष, पंकुडी सनम कुमार सिंग हे गंभीर जखमी झाले. तर पुजा सनम कुमार सिंग वय ३० यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. याचा पुढील तपास पोलीस सुतनासे हे करीत आहेत.