सासवडः पुणे-पंढरपूर रस्त्यावर बोरावके मळा येथे मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बुलेट आणि इरटिका कारची समोरासमोर धडक झाली. बुलेट दुचाकीवर असणारे दोघेजण या अपघातामध्ये गंभीरित्या जखमी झाले आहेत. संबधित दोघांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे-पंढरपूर रस्त्यावर सासवड जवळ बुलेट आणि इरटिका कारची समोरासमोर जोरदार धडक झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शंनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जेजुरीकडून येणारी बुलेट सासवडवरून राख गावी निघालेली इरटिका कार एकमेकांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये बुलेटवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती सासवड पोलिसांनी मिळताच पोलीसांनी अपघातस्थळी जाऊन रस्ता सुरळीत केला. या प्रकरणी सोमनाथ रामचंद्र सुर्वे यांनी सासवड पोलिसांत फिर्याद दिली आहे.