Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सासवडः मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंकडून जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’; रॅलीचे आयोजन करुन दाखल केला ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज 

रॅलीत तरुणांसह महिलांचा उस्फुर्त सहभाग; 'विकासाचे नाव संभाजीराव'चा नारा, 'माझं तिकीट फायनल होतं' पण.. संभाजीराव झेंडेंनी दिले स्पष्टीकरण 

by SBPRNL
October 28, 2024
सासवडः मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंकडून जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’; रॅलीचे आयोजन करुन दाखल केला ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज 

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे अपक्ष लढणार असून, त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज तहसिल कार्यालय, सासवड येथे दाखल केला. दिवे येथील कोतोबा देवाचे दर्शन करून नारळ फोडत उमेदवारीचा श्रीगणेशा करण्यात आला. दिवे ते सासवड अशी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये तरुणांसह महिलांचा उस्फुर्त सहभाग होता. संभाजीराव झेंडेचे फलक हातात धरुन विकासाचे नाव संभाजीराव अशा घोषणा देण्यात आल्या. तळपते ऊन असूनही तरुण, महिला आणि नागरिकांचा सहभाग मोठा होता. सासवड येथील शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दादा जाधवराव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात होते. या सभेला देखील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी गणेश कटके, संदिप जगताप, विजय दगडे, युवराज जगताप, चेतन मेमाणे, शेखर दिघे, योगेशनाना फडतरे, साधू दिघे, बबन,  शामकांत भिंताडे, अमोल कामथे, बाळासाहेब भिंताडे, ओंकार घुले, शिवाजी काळभोर, मा. संरपंच दत्तात्रय भोंगळे, शेतकरी कामगार पक्षाचे सचिव अॅड. राजेंद्र कोरडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

त्यावेळी मी थांबलो….. पण आता नाही !

२०१९ ला विद्यमान आमदार आणि मला पवार साहेबांनी गोविंद बाग येथे बोलावले होते. त्यावेळी साहेबांनी सांगितलं तुम्ही दोघे उभे राहिलात तर दोघांनाही मतविभाजनाचा मोठा फटका बसेल. त्यामुळे एकजण कोणी तरी थांबा, पुढच्या वेळी त्यांना संधी देण्यात येईल. त्यामुळे मी थांबलो असल्याचे झेंंडे यांनी सांगितले. त्यामुळे आताची निवडणूक जनतेने आपल्या हाती घेतलेली आहे. दोन्ही उमेवारांचा इतिहास पहा असे देखील ते यावेळी म्हणाले. ही निवडणूक पुरंदरच्या स्वाभिमानी जनेतेसाठी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

माझं तिकीट फायनल झालं होतं पण…..

शरद पवारांनी तिकीट देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मोरगाव अर्जुनी मतदार संघ तुम्हाला देतो. आणि त्या बदल्यात पुरंदर आम्हाला द्या, असे सांगण्यात आले होते. मात्र, सांगलीच्या काही लोकांनी मधस्थी करुन नावामध्ये बदल करुन घेतला असल्याचे ते यावेळी म्हणालेेेे. यामुळे आता पुरंदरची स्वाभिमानी जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीतून देखील दबाव आणून नाव बदलले असल्याचे स्पष्टीकरण झेंडे यांनी यावेळी दिले. हे घरोघरी जावून सांगा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Tags: purandharrajgadnewssambhajiraozendesanjayjagtapvijayshivtare
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सगळे ‘दंग’ पण तिकडं तमिळात थलपती विजयनं मार्केट जाम केलयं 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सगळे 'दंग' पण तिकडं तमिळात थलपती विजयनं मार्केट जाम केलयं 

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group