भोरः भोर विधानसभा क्षेत्रातील पुणे-सातारा महामार्गालतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भेट दिली. यानंतर थोपटे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी थोपटे यांनी युतीचे उमेदवार शंकर मांडेकर, अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे आणि किरण दगडे यांच्यावर टीकेची झोड उठवली. जे घुडघ्याला बांशिग बांधून निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांना पक्षश्रेष्ठींनी त्यांची जागा दाखविली आणि ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवाराला संधी मिळाली, अशी टीका थोपटे यांनी कुलदीप कोंडे यांच्यावर केली.
तसेच आयात केलेल्या उमेदवाराने आतापर्यंत अनेक पक्ष बदलेले आहेत, त्यानी पण याची माहिती देता येणार नाही. ‘आयात’ केलेल्या उमेदवाराला मतदार जागा दाखवतील, अशी घणाघाती टीका थोपटे यांनी युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्यावर केली. किरण दगडे हे मतदारांना वेगवेगळी प्रलोभने दाखवित आहेत. मतदारांना यात्रा जत्रा करून आणत आहेत. सभेसाठी भाड्याने लोक आणली. गंगापूजनाच्या नावाखाली दगडे हे लोकांना सभेला नेत आहेत. दिवाळीचा फराळाचे वाटप करीत आहेत, असे आरोप थोपटे यांनी किरण दगडे यांच्यावर केले. अशी अनेक प्रलोभनाचे आमिष दगडे मतदारांना दाखवित आहेत. परंतु मतदार हे सुज्ञ असून ते अशा कोणत्याही प्रलोभने आमिषाला बळी बडणार नसल्याचा विश्वास संग्राम थोपटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
पुढे ते असे म्हणाले, ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात कोंडे यांनी विधानसभेची गणित डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना सेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, मतदारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य दाखवित कोंडे यांना त्यांची जागा दाखवली. यावेळी मानसिंगबाबा धुमाळ, रविंद्र बांदल, माऊली शिंदे, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, महेश टापरे, के. डी. भाऊ सोनवणे, पोपटराव सुके, रोहन बाठे, शरद जाधव, आदित्य बोरगे, आदित्य शिंदे, माऊली पांगारे, भरत बोबडे, विद्या यादव, निशा सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोंडें सहानभुतीच्या लाटेवर स्वार
आपले तिकीट कापल्याने कुलदीप कोंडे हे नाराज झाले होते. यामुळे बंडखोरी करून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना एक सभा घेऊन त्या सभेच्या माध्यातून अनेक आरोप केले. यामध्ये त्यांना सहानुभती मिळेल, असे त्यांना वाटत आहे. मात्र, भोरची जनता अत्यंत सुज्ञ असून, त्यांना सगळे कळेत आणि वेळ आल्यावर त्यांना हवे तेच करत असल्याचे थोपटे यावेळी म्हणाले.
दगडेंकडून मतदारांना प्रलोभनांचे आमिष
भोर विधानसभा मतदार संघात गेल्या काही दिवसांपूर्वी किरण दगडे यांनी मतदारांना प्रलोभने दाखवित दिवाळी फराळाचे वाटप केले होते. मतदारांना विविध आकर्षण दाखविण्याकरिता त्यांचा खाटाटोप सुरू आहे. जत्रा यात्रेचे आयोजन मतदारांना भुरळ पाडण्यासाठी ते करीत आहेत. सध्याच्या घडीला मतदारांना भुरळ पाडण्यासाठी दगडे यांनी नवा फंडा आणला असल्याची टीका थोपटे यांनी केली. या नव्या फंड्याला भोरची जनता भुलणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले.