भोर: महाविकास आघडी उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या भागातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रिंग रोडचा होता. चुकीच्या सर्वेक्षणमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी त्यामध्ये जात होत्या, त्या संदर्भात रिंगरोड विरोधी कृती समितीच्या माध्यमातून उभारलेल्या लढ्याला मिळालेल्या यशामुळे केळवडे, कांजळे, खोपी, कांबरे, नायगाव ही गावे रिंग रोडमधून वगळण्यात आली असून, या पाच गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील रिंगरोड आरक्षणाचे शिक्के करून शेतकऱ्यांना मोफत रिंग रोड मुक्त सातबाऱ्याचे वाटप केले असल्याची माहिती थोपटे यांनी यावेळी बोलताना दिली.
थोपटे यांनी हरिश्चंद्री, खडकी, उंबरे, करंदी खे.बा. देगाव, कांबरे खे.बा. साळावडे, केळवडे, कांजळे, वरवे, शिवरे, खोपी, कासुर्डी खे.बा. कुसगांव, रांजे, ससेवाडी, शिंदेवाडी, वेळू या गावातील नागरिकांशी संवाद साधला.
वेळू, शिंदेवाडी, ससेवाडी, खेड-शिवापूर व कासुर्डी या भागातील कंपन्यांमध्ये वाढती विजेचे मागणी पाहता व कंपनी व्यवस्थापकांना येणा-या विद्युत विषयक आडचणी जाणून घेऊन नवीन सबस्टेशन उभारणी करून त्या सोडविण्यासाठी एमएसईबीचे कार्यकारी अभियंता यांच्या समवेत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केला असे थोपटे यावेळी म्हणाले.
कोविडच्या काळात ससेवाडी येथे ४८ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारून कोविड पेशंटला रेमडीसीवर इंजेक्शनसह उपचार सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
‘ही’ विकास कामांची थोपटे यांनी दिली माहीती
- शिवरे रस्ता १ कोटी ६ लाख
- शिवगंगा नदीवरील पुलाचे काम १ कोटी ५० लाख
- कुसगांव खोपी कांजळे साळावडे ते वरवे बु.पुलाचे काम ५ कोटी ६२ लाख
- केळवडे ते बनेश्वर रस्ता ५५ लाख
- वरवे जोड रस्ता ८५ लाख
- देगांव राव्हेकर वस्ती रस्ता करणे ७० लाख
- देगांव मधील बंधारे ६५ लाख
- खडकी उंबरे रस्ता ४४ लाख
- वेळू येथे साकव ७० लाख
- वेळू, कुसगांव, कुरुंगवडी नायगाव, देगांव, कामथडी नळपाणी पुरवठा योजना करणे यासाठी कोट्यावधी निधी
- हरिश्चंद्र येथे को.प.बंधारा बांधणे २ कोटी ८० लाख
- हरिश्चंद्री ते निगडे फाटा रस्ता करणे ४ कोटी ८० लाख
अशी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून या भागातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली असल्याची माहिती थोपटे यानी दिली. त्याचप्रमाणे पी एमआरडीए अंतर्गत येणारे रस्ते यासाठी निधी अनेक घरकुले मंजूर करून लाभार्थीना अनुदान मिळवून देण्याचे काम करता आले, या केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून आपण मतदार बंधू भगिनी यांच्या पर्यंत पोहचत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मानसिंग बाबा धुमाळ, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, शैलेश सोनवणे, आबासाहेब यादव, पोपटराव सुके, शिवाजी नाना कोंडे, अशोक आबा शेलार, माऊली पांगारे, अशोक वाडकर, हिरामण पांगारे, धनंजय वाडकर, लहुनाना शेलार, रोहन बाठे, आदित्य बोरगे, गणेश खुटवड, रणजित बोरगे, विद्या यादव, दुर्गा चोरघे, रुक्मिणी पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.