भोरः येथील गोवर्धन मंगल कार्यालयात शिवसेना(शिंदे) पक्षाच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीत महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी मिळालेले शंकर मांडेकर यांचे एकदिलाने काम करण्यासाठी तसेच त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना तालुक्यातून भरघोस मतांनी विजय करण्यासाठी काम लागण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना करण्यात आले. शिवसेनेतील हरएक पदाधिकारी व कार्यकर्त्यांने जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असा निर्धान करण्यात आला.
यावेळी गीतांजली ढोले (संपर्कप्रमुख पुणे जिल्हा), कांता पांढरे (महिला पुणे जिल्हा प्रमुख), गणेश मसुरकर (भोर विधानसभा प्रमुख), उज्वला पांगारे (महिला तालुका प्रमुख), शिवाजी अवचरे (मागासर्गीय जिल्हा आघाडी प्रमुख), राहुल माने (संघटक भोर तालुका), केतन देवकर (शिवसेना उपतालुका प्रमुख), अक्षय सणस (युवासेना उपतालुका प्रमुख), सुदर्शन काटकर, ओंमकार तांदळे, आदित्य तिखोळे, राजेंद्र पवार, चंद्रकांत शेलार, विशाल लेकावळे, सुनील मळेकर, विशाल पवार, प्रवीण गाडे, विकास वाटकर, संकेत खाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आढावा बैठकीचे आयोजन दशरथ जाधव भोर तालुका प्रमुख यांनी केले होते.
युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणार
युतीच्या सरकाने महिलांचा सन्मान म्हणून त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा फायदा राज्यातील अनेक महिलांना झाला आहे. आता या योजनेचे मानधन १५०० रुपये वरून २१०० रूपये करण्यात आले आहे. यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा युतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निश्चिय या बैठकीत करण्यात आला. शिवसेनेमध्ये वरिष्ठांने घेतलेल्या निर्णयांचे पालन करून त्याची अमंलबजावणी केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाचे आणि युतीचा धर्म म्हणून युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रस्थापितांना जनता कंटाळली, प्रस्थापितांविरोधातील लढा कायम
वर्षानुवर्ष तालुक्याला एकच आमदार आणि खासदार लाभेलेले आहेत. लोकांना बदल हवा आहे, त्या दृष्टीने इथला मतदार विचार करीत आहे. लोकं यांना कंटाळली असल्याचा चिमटा यावेळी काढण्यात आला. कोणतीही सत्ता हातामध्ये नसताना काम करणारा नेता म्हणजे शंकरभाऊ मांडेकर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तुमच्याकडे सत्ता असताना इथल्या लोकांना वेड्यात काढण्याचे काम तुम्ही केले आहे, यामुळे आपल्या सर्वांना युतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आहेत. प्रस्थापितांविरोधातील हा लढा कायम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार देखील या आढावा बैठकीत करण्यात आला.