भोरः अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी भोर सेवा केंद्र महाडनाका केनॅाल रोड भोर यांच्या वतीने भाद्रपद मासातील विशेष त्वरित फलदायक सेवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत एकूण ११००० आवर्तने करण्यात येणार आहेत. या केंद्रात दररोज सकाळी भूपाळी आरती, नैवेद्य, संध्याकाळची आरती करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ १ माळ जप, श्री अथर्वशीर्ष पठण – ११ वेळा (आवर्तने ), श्री कालभैरवअष्टक – १ वेळा, ऐक्य मंत्र – १ वेळा प्रार्थना केली जात आहे. या उपक्रमाअंतर्गत सामुहिक/वैयक्तिक श्री अथर्वशीर्ष पठण सेवा वनवासी कल्याण आश्रम भोर
तसेच शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भोर,विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल भोर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऊत्रोली येथील विद्यार्थी व शिक्षक पालक या सर्वांनी सहभागी होऊन गणपती बाप्पाची आरती करण्यात येणार असल्याचे स्वामी सेवेकरी
संतोष कदम यांनी सांगितले.