भोर : जिल्हा वार्षिक योजना(जिल्हा नियोजन)सन २०२३-२४ महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकास कामे पुणे जिल्हा पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठकीत रणजित शिवतरे यांच्या शिफारस, संदर्भिय पत्रान्वये मंजूर झाली असून या विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी विद्यमान आमदार व काँग्रेसचे पदाधिकारी यांनी जाणुन-बुजूण जनतेची दिशाभूल करण्यासाठी आज शुक्रवार (दि.४)ला अचानक या मंजूर होऊन आलेल्या विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम घेऊन कामांचे भूमिपूजन केले. काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यमान आमदारांनी सदर कामांच्या मंजुरी आपण आणली असे सांगत जनतेची दिशाभूल केली आहे जिल्हा नियोजन समिती कामे देत नाही म्हणून विद्यमान आमदार महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून अजित पवारांबदद्ल नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा जिल्हा नियोजन समितीच्या कामांचे श्रेय घेत आम्ही कामे वरून मंजूर करून आणली अशी जनतेची दिशाभूल करण्याचे काम आमदार व कांग्रेसने केले आहे. भाटघर व वीर धरण प्रकल्पग्रस्त नागरी सुविधा विकासकामांच्या बाबतीतही यांनी असेच केले असे प्रतिपादन भोर येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जि.प.माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी केले.
शिवतरे पुढे म्हणाले ४ कोटी २५ लाखांच्या विविध विकासकामांची प्रशासकीय मंजूरी झाली असून या विकास कामांमध्ये भोर नगरपरिषद हद्दीतील भोई आळी येथे दिलीप रोमण घरासमोरील काँक्रिटीकरण रस्ता व गटार बांधणे १५ लक्ष , संजय नगर येथील डॉक्टर तारू दिघे घर पवार सर ते कुणाल शिंदे यांच्या घरापर्यंतचा रस्ता करणे३५ लाख, संजय नगर येथील खंडोबा मंदिर ते भोरदरा धनगर वस्ती रस्ता करणे ५० लाख , शहरातील वेताळ पेठ येथील जुबली तलाव सुशोभीकरण करणे २५ लाख ,भोर शहरातील विविध भागात स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे १० लाख , शहरातील नगरपालिका शाळेच्या डिजिटल रूम बनवणे १५ लाख, वाघजाई मंदिर येथे भुयारी गटर कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख, वेताळ पेठेतील जुन्या जलशेजारील नगरपालिका हद्दीत अभ्यासिका व सभामंडप बांधणे ५० लाख, प्रभाग क्रमांक एक मधील मुरलीधर तारू घर ते श्री चव्हाण घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १४ लाख ३५ हजार रुपये प्रभाग क्रमांक तीन मधील मशालीचा माळ नीरा घाट शेजारी रस्ता कॉँक्रेटींग करणे व पेव्हींग ब्लॉक बसवणे व रेलिंग बसवणे ७ लाख ८४ हजार,शंकर सावंत घर ते पिराचा मळा ड्रेनेज लाईन करणे ३३ लाख ७८ हजार ,वाघजाई नगर विभुते करते कोठावळे घर नाला ड्रेनेज लाईन करणे ९ लाख १८ हजार , प्रभाग क्रमांक ३ श्रमीक हॉलच्या पाठीमागील बाजूस ड्रेनेज लाईन करणे २ लाख ४० हजार, आतार घर ते रियाज शेख रस्ता काँक्रीटमेंट करणे १६ लाख ९५ हजार ,काळा गणपती चौक ते राजवाडा कमान रस्ता रुंदीकरण करणे ३५ लाख ६७ हजार , सरकारी वहाळ ते महालक्ष्मी सोसायटी ते भोरेश्वर मंदिर पिछाडी दोन्ही बाजूस गटर काम करणे ३७ लाख ७५ हजार , प्रभाग क्र. ४ मधील भिलारे वाडा ते एसटी स्टँड पर्यंत पेव्हींग ब्लॉक बसविणे ३२ लाख १९ हजार तसेच प्रभाग क्र.४ मधील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पेव्हींग ब्लॉक बसवणे ३२ लाख १९ हजार अशा भोर शहरातील प्रस्तावित विकास कामांना पुणे जिल्हा पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. विरोधकांनी कितीही विकास कामांचे श्रेय लाटले तरी ,येणाऱ्या आगामी निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवू यावेळेस परिवर्तन अटळ आहे घोडे मैदान जवळ आहे. असे पत्रकार परिषदेत रणजीत शिवतरे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार पक्ष) शहराध्यक्ष केदार देशपांडे, ज्येष्ठ नेते यशवंत डाळ, सोमनाथ ढवळे, कुणाल धुमाळ,शिवसेना (शिंदे पक्षाचे) नितीन सोनावले, भाजपाचे सरचिटणीस कपिल दुसंगे, अतुल काकडे असे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.