भोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचाराचा शुभारंभ करीत सभेच्या माध्यमातून अनेक मुद्यांना हात घालून प्रस्थापितांविरोधात टीकेची झोड उठवली आहे. अनेक प्रश्न उपस्थित करीत १५ वर्षांत कोणता विकास झाला असा सवाल कोंडे यांनी केला आहे. तसेच मला जर ५ वर्ष भोर विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर एका वर्षांत एमआडीसी आणणार असल्याचा शब्द कोंडे यांनी भोरवासियांना सभेच्या माध्यमातून दिला आहे. त्यांच्या या सभेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. राजा रघुनाथ विद्यालयाच्या भव्य मैदानावर कुलदीप कोंडे यांच्या सभा पार पडली.
भोर विधानसभा क्षेत्रातील सर्वांत जास्त ज्वलंत प्रश्न भोर एमआयडीसाचा आहे. गेले अनेक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भोर वासियांना एमआडीसीची केवळ गाजर दाखवले जाते. इथल्या तरुणांच्या हाताला काम नसल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण शहरात स्थलांतरित होताना दिसत आहे. जर त्यांना रोजगार येथे उपलब्ध झाला तर त्यांचे स्थलांतर थांबणे आणि पर्यायाने भोरच्या भूमिपूत्राला हक्काची नोकरी मिळेल अशी मागणी सातत्याने होत आहे. अजूनही हा ज्वलंत प्रश्न सुटलेला नाही. यामुळे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचाराच्या पहिल्याच सभेत संधी देल्यास एका वर्षांत भोरमध्ये एमआयडीसी आणणार असल्याचा शब्द भोरवासियांना दिला आहे.