राजगडः पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व कृषी शिक्षण व संशोधन महामंडळ महाराष्ट्र राज्य वासुदेव नाना काळे व तात्यासाहेब गावडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भाजपा यांच्या हस्ते पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी आनंद देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी आकाश कांबळे सरचिटणीस, पुणे जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहल दगडे, जिल्हा सचिव सचिन मांडके, देवा हनमघर, पंकज खुर्द, नानासाहेब शेंडे, महिला सरचिटणीस जानवी बोरसे तसेच वेल्हे तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कैलास बिरामने, प्रमोद पासलकर, अण्णासाहेब शेंडकर, शिवाजी आप्पा सोनवणे, भाऊसाहेब मरगळे, प्रकाश बोडके, उत्तम दादा रेणुसे, अनंता आधवडे, विशाल शिळीमकर, एकनाथ पोळेकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले.
 
								 
                                
 
                                 
                                 
                                 
		





 
							










