वेल्हाः राजगड तालुक्यातील एका गावात मंगळवारी दि. २७ अॅागरस्ट रोजी एका गावात महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. राजगड पोलीस स्टेशनला एका २७ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी रणजित बबन पोळ यांस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एका गावातील त्यांच्या घरात फिर्यादी महिला असाताना आरोपी घरात घुसला. त्यानंतर त्याने “तुम्ही मला खूप आवडता. मी येताना-जाताना तुम्हाला पाहतो. पण तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही.” असे म्हणत पीडित महिलेचा उजवा हात धरीत महिलेला मिठ्ठी मारली. त्यानंतर पीडित महिलेने कसेबशी सुटका करुन घेत पतीला फोन केला आणि संपूर्ण प्रकारणाची माहिती दिली. ११२ वरुन पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.