काल सकाळी भोर शहराच्या जवळील भोलावडे गावच्या हद्दीतील पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळील खड्डा पडल्याचे वृत्त राजगड पोर्टल न्यूजच्या माध्यमातून तालुक्यात सर्वत्र पसरले होते आणि त्यामध्ये संबंधित बांधकाम विभागाच्या प्रशासनाने तातडीने लक्ष टाकून संबंधित खड्डा बुजविला पाहिजे असे नागरिकांकडुन सांगण्यात आले होते. काल सायंकाळी संबंधित प्रशासनाने याची दखल घेत हा खड्डा व या रस्त्यावरील इतरही खड्डे तात्काळ दखल घेऊन सिमेंट काँक्रीटचा भरावा करून बुजविले असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले त्यामुळे सकाळी पसरलेल्या राजगड न्यूज वृत्ताच्या बातमीचा चांगला इफेक्ट झाला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.
तालुक्यात इतरही ठिकाणी रस्त्याला अशाच प्रकारचे मोठमोठाले खड्डे पडले आहेत संबंधित प्रशासनाने याचीही दखल घेऊन संबंधित खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या तालुक्यात होत असणाऱ्या अति मुसळधार पर्जन्यवृष्टीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास विलंब होत आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तालुक्यातील बहुतेक ठिकाणचे रस्ते पावसाळ्यातही हे वाहतूकीसाठी अतिशय सुसज्ज चांगले असल्याचेही या विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रमुख कारण पाणी निचरा न होण्याचे आहे.
भ