भोर : येथील कोंढणपूर ते बांडेवाडी रस्त्यावर बांडेवाडी (श्रीरामनगर) गावच्या हद्दीतील बांधकाम चालू असलेल्या मंगल कार्यालयासमोर २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन लोखंडी रॅाडने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली असून, महेश तानाजी घोगरे, महेश उर्फ पप्पू किसन कोंढाळकर दोन्ही राहणार (आर्वी ता. हवेली जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल हनुमंत घोगरे (वय 33 वर्ष) यांचे २० सप्टेंबर रोजी साडेचार वाजण्याच्या आधी झालेल्या भांडणाच्या कारणावरून कोंढणपूर ते बांडेवाडी रोडवर बांडेवाडी (श्रीरामनगर) गावचे हद्दीत ता. हवेली जि पुणे बांधकाम चालू असलेल्या मंगल कार्यालयासमोर महेश तानाजी घोगरे, महेश उर्फ पप्पू किसन कोंढाळकर या दोघांनी लोखंडी रॅाडने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या घटनेत घोगरे हे जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.