Wednesday, October 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

राजगड सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाचा दर चांगला देणार-चेअरमन संग्राम थोपटे

शेतकरी बांधवांशी सवांद साधत ऊस लागवडीचे केले आवाहन

by Aakanksha Yadav
October 6, 2025
राजगड सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाचा दर चांगला देणार-चेअरमन संग्राम थोपटे

भोर – येथील अनंतराव थोपटे महावि‌द्यालयातील फार्मसी हॉलमध्ये राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्याशी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी संवाद साधत कारखाना कार्यक्षेत्रात अधिक प्रमाणात ऊसाची लागवड करून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन करून पुढील गाळप हंगाम व्यवस्थितरित्या सुरु करण्यात येणार असून त्याकरिता ऊस लागवडीची माहिती दिली. शेतकऱ्यांना ८६,०३२ या जातीचे बेने साडे चार ते पाच फुट पट्टा पद्धतीने ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऊस बियाणे देण्यात येणार असून त्याच जातीच्या ऊस बियाण्यासाठी लागणारी खते कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना शेताच्या बांधावर पुरवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.भोर व राजगड तालुक्यातील युवा शेतकरी यांच्या मार्फतच ऊस बियाणे नर्सरी निर्मिती करून त्याच्या माध्यमातून ऊस बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे नवीन रोजगारही निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच शेतरस्ते, वीजसमस्या, सिंचन योजना, ऊसतोडणी यंत्रणा याबद्दल शेतकऱ्यांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या. यावर सकारात्मक चर्चा करून योग्य नियोजन करण्यात येणार असून विभाग निहाय अधिकारी नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी सवांद साधून माहिती देण्यात येईल, त्याचबरोबर येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने राजगड सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या ४६७ कोटी रुपये कर्जहमी बद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करत नवीन कारखान्याच्या निर्मितीमुळे प्रतिदिन ३५०० मॅट्रिक टन गाळप क्षमता, ६० के.एल.पी.डी.डिस्टीलरी प्रकल्प, १२ मेगावॅट वीज निर्मिती, ५ टन सी.एन.जी. गॅस निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्यामुळे इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दर देता येणे शक्य होणार असल्याचेही कारखान्याचे चेअरमन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी सांगितले. कारखाना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नव्याने सुरु होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गात उत्सहाचे व आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्याचा शेतकरी बांधवानी यावेळी विश्वास व्यक्त केला.यावेळी कारखान्याचे संचालक उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, प्रभारी कार्यकारी संचालक आव्हाड, मा. संचालक विठ्ठल कुडले, मा. कृषी अधिकारी प्रगतशील शेतकरी संपत थोपटे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
Next Post
Bhor – भोरला पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणीसाठी पदवीधरांना आवाहन

Bhor - भोरला पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणीसाठी पदवीधरांना आवाहन

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group