सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
एचएसबीसी व अफार्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कैलास मठ महादेव मंदिर गुरोळी या ठिकाणी मियावॉकि या जपानी नैसर्गिक तत्त्वज्ञानाच्या आधारे दोन गुंठ्यांमध्ये 520 जंगली झाडांचे रोपण करण्यात आले आहे. मियावॉकि या जपानी नैसर्गिक तत्त्वज्ञानाच्या आधारे दाट पद्धतीने जंगल होईल, असे पर्यावरणाला साजेल असे स्वरूप प्राप्त होईल असे जंगली झाडे या ठिकाणी लावण्यात आली आहेत.
200 मीटर स्क्वेअरमध्ये एक मीटर × एक मीटरचा चौकोन तयार करून त्याच्यामध्ये चार झाडे लावली जातात. यापासून निसर्गामध्ये जंगल तयार होईल व हवेतील कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्याचा हेतू लक्षात घेऊन या पद्धतीने वृक्षारोपण केले जाते. तसेच फार्म संस्थेद्वारे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते, असे अफार्म संस्थेचे संचालक शांताराम साकोरे यांनी सांगितले.
यावेळी एचएसबीसी सॉफ्टवेअर कंपनीचे कर्मचारी, गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र चांदगुडे, प्रकल्प संचालक महेश सदातपुरे, कृषी विस्तार अधिकारी अमित कुमार मेहेत्रे, अभियंता यश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी बाजीराव मंडलिक, अभियंता देवेंद्र सोनी, जालिंदर खेडेकर, आनंद खेडेकर, वर्षा खेडेकर, गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टचे सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.