पुणेः राज्यात आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. ठिकाणठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करण्यात येते. यावेळी मोठ्या प्रमाणात साऊंड लावले जातात. याच साऊंडच्या आवाजामुळे एका ३२ वर्षीय तरुणाला त्याच्या कानाचा आवाज गमवावा लागल्याची माहिती मिळत आहे. कात्रज परिसरात राहणाऱ्या सागर मोरे या तरुणाला मिरवणुकीनंतर काही वेळ आवाज ऐकू येणे बंद झाले होते. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याला काही प्रमाणात ऐकू येवू लागले आहे. पण जे सर्वसामान्य माणसाला जसे आवाज कानाने ऐकता येतात, तितकी या तरुणाने यापुढे ऐकता येणार नाही.
साऊंडबाबत अनेकांकडून सांगण्यात येते, मात्र दरवर्षी साऊंडची तीव्रता वाढत चालल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. खरतर मिरवणुकीत साऊंडऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा असे सांगण्यात येते. परंतु त्यांची अमलंबजावणी फार कमी मंडळ करतात. यामुळे सागरसोबत घडलेल्या घटनेमुळे काहीजण तरी धडा घेतली अशी आशा आहे.
कात्रजमधील शूर शिवबा मित्र मंडळाचा कार्यकर्ता सागर हा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी साधारण चार तास साउंड समोरील ट्रॅक्टर वर उभा होता, मी स्वतः कमीत कमी दोन वेळा सर्वांना खाली उतरविण्याचे प्रयत्न केले. नंतर मिरवणूक कात्रज बस स्टॉप समोर आली आणि त्या ठिकाणी चार मंडळांचे साऊंड एकत्र वाजू लागले आणि जेव्हा एक तासाने मिरवणूक कात्रज तलावावर थांबली, तेव्हा सागरला ऐकू येणे बंद झाले. त्वरित मिळालेल्या उपचारामुळे सागरचा एक कान 70% टक्के बरा झालाय, पण दुसऱ्या कानाने तो कायमस्वरूपी बहिरा होवू शकतो. आपण सर्वांनी या प्रकारातून काहीतरी शिकले पाहिजे.वसंत मोरे (मा. नगरसेवक कात्रज)