भोरः भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी पुणे-सातारा महामार्गालगतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. या भागातील मुख्यत: वीर प्रकल्पग्रस्त बाधित गावांना १८ नागरी सुविधा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असल्याचे थोपटे यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक गावातील विकास कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे थोपटे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
पूर्व भागातील काळेवाडी, केंजळ, किकवी, दिवळे, कापूरव्होळ, निगडे, धांगवडी, मोरवाडी, वागजवाडी, सारोळे, सावरदरे, पांडे, राजापूर, भांबवडे, न्हावी, पेंजळवाडी, गुणंद, वाठार हिंगे, टापरेवाडी, भोंगवली गावांना थोपटे यांनी भेट दिली. यावेळी मानसिंगबाबा धुमाळ, रविंद्र बांदल, माऊली शिंदे, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, महेश टापरे, के. डी. भाऊ सोनवणे, पोपटराव सुके, रोहन बाठे, शरद जाधव, आदित्य बोरगे, आदित्य शिंदे, माऊली पांगारे, भरत बोबडे, विद्या यादव, निशा सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारोळा-वीर-न्हावी, इंगवली -काळेवाडी – किकवी -बांदलवाडी रस्ता, भोंगवली फाटा-माहूर परिंचे रस्ता व भोंगवली -माहूरखिंड-परिंचे हे रस्ते तसेच शिवरे जोड रस्ता, किकवी सावरदरे रस्ता, कुसगांव-खोपी-कांजळे-साळवडे रस्त्यांची कामे करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. तसेच पीएमआरडीएच्या योजनेअंतर्गत अनेकांना घरकूल अनुदान देण्याचे काम केले असल्याची माहिती थोपटे यांनी दिली. त्यामुळे या भागातील मतदार महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पाठबळ पाठिशी असल्याचा विश्वास थोपटे यांनी यावेळी व्यक्त केला.