Monday, July 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणेः हॅलो, तुमच्यावर कायदेशीर कारवाई…… म्हणत महिलेला सायबर चोरट्यांनी घातला तब्बल २ लाखांचा गंडा

महिलेची आर्थिक फसवणूक, विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

by SBPRNL
August 26, 2024

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे 

पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या माहिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल 2 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, ही घटना ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान घडली असल्याची माहिती आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. पीडितेला सायबर फसवणूक करणाऱ्यांचा कॉल आला होता. यामध्ये पीडितेला तिच्या नावावर 12 बनावट एटीएम कार्ड, बनावट पासपोर्ट आणि 140 ग्रॅम एमडी ड्रग्ज असलेले पार्सल मलेशियाला पाठवले गेले आहे. असल्याची बतावणी करण्यात आली. तसेच सायबर चोरट्यांनी पीडितेला अटक करण्याची धमकी देऊन पोलिसांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेला दुसरा एक कॉल आला. त्यामध्ये दिल्लीतील वसंत कुंज पोलीस स्टेशनमधून बोलत असल्याचे सांगण्यात आले. मनी लाँड्रिंग तपासण्यासाठी पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले आणि आरबीआयमध्ये पैशाची पडताळणी करण्यास सांगितले. त्यानुसार, पीडितेने आरोपींनी प्रदान केलेल्या वेगवेगळ्या UPI आयडीवर तब्बल 2 लाख रुपये ट्रान्सफर केले.

पीडितेला पुन्हा एक कॉल आला. ज्यामध्ये कॉलरने पीडितेला थर्मल इमेजिंग करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच ड्रग्सचे सेवन केले आहे किंवा तिच्या शरीरात कोणतेही ड्रग लपवले आहे का, हे तपासण्यासाठी तिला कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात सुमित विश्रा, सुनिल कुमार आणि अनिल यादव यांनी संगनमताने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास अरूण घोडके, पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

Tags: cybercrimePunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post

पुणेः आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्या: मुरलीधर मोहोळ यांची मागणी

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group