Wednesday, July 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Pune helicopter crash – बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

महिन्याभरातील दुसरी घटना

by SBPRNL
October 2, 2024
Pune helicopter crash – बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

पुणे : बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि शासकीय रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बावधन बुद्रुक येथील के.के. कन्स्ट्रक्शन येथे बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. हेरिटेड एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. मात्र उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.

You might also like

पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी

खंडाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि प्रशिक्षणार्थी लाच प्रकरणात अटक

राजगडः किल्ले राजगड स्वच्छता, पदभ्रमंती मोहिम फत्ते; वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आयोजन

बावधन भागामध्ये ऑक्सफर्ड गोल्फ अँड काऊंटी नावाचे रिसॉर्ट असून तिथे एक हेलिपॅड आहे. याच हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहूच्या दिशेने उड्डाण घेतले होते. मात्र पहाटेच्या सुमारास धुके जास्त असल्याने डोंगराळ भागात हेलिकॉप्टर भरकटले आणि कोसळले. हेलिपॅडपासून दीड किलोमीटर अंतरावरच हा अपघात झाला. यात दोन पायलटसह एका इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला.

हेलिकॉप्टर अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते आणि तिघांचाही या अपघातात मृत्यू झाला. मृतांची ओळख पटलेली नाही. पुणे कंट्रोल रुमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

महिन्याभरातील दुसरी घटना

दरम्यान, हेलिकॉप्टर कोसळण्याची महिन्याभरातील ही दुसरा घटना आहे. याआधी 24 ऑगस्ट रोजी मुळशी तालुक्यातील पौड जवळ हेलिकॉप्टर कोसळून तीन जण जखमी झाले होते.

Tags: anticorraptionpuneHelicopter crashjedheprathisthanpune
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी
क्राईम

पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी

November 30, 2024
खंडाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि प्रशिक्षणार्थी लाच प्रकरणात अटक
क्राईम

खंडाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि प्रशिक्षणार्थी लाच प्रकरणात अटक

October 22, 2024
राजगडः किल्ले राजगड स्वच्छता, पदभ्रमंती मोहिम फत्ते; वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आयोजन
ताज्या बातम्या

राजगडः किल्ले राजगड स्वच्छता, पदभ्रमंती मोहिम फत्ते; वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आयोजन

September 24, 2024
ताज्या बातम्या

Breking News : पौड जवळ हेलिकॉप्टर अपघात: चार जखमी, दोनची प्रकृती गंभीर

August 24, 2024
Breaking News: सासवडमध्ये पन्नास हजारांची लाच स्विकारताना पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांना अटक
ताज्या बातम्या

Breaking News: तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात; वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

August 21, 2024
Next Post
शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; महाविजय संवाद मेळाव्याला पक्षातील बड्या नेत्यासह शिवसैनिकांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण

शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; महाविजय संवाद मेळाव्याला पक्षातील बड्या नेत्यासह शिवसैनिकांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group