पुणेः एप्रिल महिन्यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे वय २६ वर्ष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार सचिन अहिवळे यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी त्याच्या पत्नीला भेटण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
जुन्या भांडणाचा मनात राग धरुन केला होता हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४/०४/२०२४ रोजी त्याचा मित्र व फिर्यादी हे जयंती पाहण्यासाठी नवी पेठ येथे आले होते. त्यावेळी आपण सोबत जेवन करु, असे म्हणून फिर्यादीला दुचाकी चालविण्यास सांगून पाठीमागे बसून घोलप मटन शॉप समोर पोहचले असता, फिर्यादीच्या पाठीमागे बसलेल्या आरोपीने पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन धारधार हत्याराने फिर्यादीच्या मानेवर वार करुन “आज मी तुला सोडणार नाही, तुला खल्लास करतो, तु खुप दिवसानंतर सापडलास” असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार वरीलप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आरोपी हा गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असल्याने आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकास आदेशीत केले होते.
सापळा रचून आरोपीला केली अटक
विश्रामबाग पोलीस स्टेशन येथील अंमलदार सचिन अहिवळे यांनी तांत्रीक विश्लेषनाचे आधारे व गोपणीय खबऱ्याच्या मदतीने आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळयामागे त्याच्या पत्नीस भेटण्यास नन्हे येथे येणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळवली. त्यानुसार सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे व पोलिस स्टॉप यांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त संदिपसिह गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार सचिन अहिवळे, मयुर भोसले, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने व सागर मोरे यांनी केलेली आहे.