पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथील सर परशुराम विद्यालयाच्या मैदानावर सभेच्या आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभा पार पडणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने सुरक्षितेचा उपाय म्हणून कडक पोलीस व केंद्रीय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, पंतप्रधानचा हातात धनुष्यबाण घेतल्याचे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. येथील रस्त्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात धणुष्यबाण घेतलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर विकासाचं नाव लाडकं धनुष्यबाण अशी टॅगलाईन लिहिण्यात आली आहे.
या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान काय बोलणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मोदींच्या सभास्थळी महायुतीमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे. तसेच पुणेकर देखील मोंदीची सभा ऐकण्यासाठी उत्सुक झाले आहेत. मोदी या सभेच्या माध्यमातून कोणावर निशाणा साधणार हे पाहणे औचुक्याचे असणार आहे. तसेच पुण्याबद्दलचे पुढचे व्हिजन काय असणार या बद्दल ते काय बोलणार हे देखील महत्वाचे असणार आहे.