भोर: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी भोर विधानसभेतील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीत बंडखोरीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि. २९) सकाळी भोर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत मांडेकर आपला अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भोर-राजगड-मुळशी मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला असून, विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी ही जागा शिवसेनेला (उबाठा) मिळावी, यासाठी आग्रह धरला होता. मात्र, काँग्रेसला ती जागा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मांडेकरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुळशी तालुक्यात मांडेकर यांचा प्रभाव आहे आणि भोर-राजगड या भागात संग्राम थोपटे यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मांडेकरांचा बंडखोरीचा निर्णय महाविकास आघाडीला फटका बसवू शकतो.
बैठकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करण्याचा निर्धार?
पुणे या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती बैठकीत काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांना उमेदवारी दिली तरच आम्ही मतदान करू अन्यथा आम्ही बंडखोरीत करणार हे निश्चित तसेच पक्षांनी कारवाई केली तरी देखील आम्ही मागणार नाही व आम्ही सर्व पदाधिकारी एकावेळी राजीनामा देऊ अशी भूमिका सचिन आहे यांच्यासमोर शिवसैनिकानी मांडली.