उत्तर प्रदेश : पातालकोट एक्सप्रेस (patalkot express) रेल्वेमध्ये प्रवाशांना तिकटी आहे का, असे म्हणत आपण टीसी असल्याचे भासवित एक महिला प्रवास करीत होती. रेल्वेच्या एका बोगीत आल्यानंतर त्या महिलेविषयी आरपीफ जवानाला संशय आल्याने जवानाने या माहिलेला काही प्रश्न विचारले असता, महिलेची पुरती घाबरगुंडी उडाली आणि ही माहिला टीसी नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तुमच्याकडे आयडी कार्ड आहे का किंवा तुम्ही रेल्वेमध्ये काम करत आहात याचा पुरावा आहे का, असा प्रश्न आरपीफ जवानाने त्या माहिलेला केला असता, मी सांगू शकत नाही असे उत्तर तिने दिले. यामुळे जवानाचा संशिय अधिक बळावला. या कथित टीसी महिलेकडे अधिक चौकशी केली असता ती टीसी नसल्याचे उघड झाले असून, या महिलेला झांशीमध्ये आरपीफने कस्टडीमध्ये घेतले आहे. तिचे चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.