भोर – देशात सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस (दि.१७) मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. भोर शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांना आरोग्यदायी फळे , बिस्किटे पुडे वाटप करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील भाजप पदाधिकारी रविंद्र कंक, सचिन मांडके, पंकज खुर्द , दिपाली शेटे, स्वाती गांधी , चंद्रकांत मळेकर, सादिक फरास, सचिन तारु , प्रमोद कुलकर्णी ,विशाल दुसंगे समीर घोडेकर ,अमोल शहा ,बच्चू आतार ,सुरेश कांबळे उपस्थित होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मोदीजी आपल्या देशाला जागतिक पातळीवर बळकट आणि सामर्थ्यशाली बनविणारे पंतप्रधान असुन कर्तव्यकठोर, ध्येयवादी, सुसंस्कृत, कार्यक्षम देशाचे वर्तमान आणि भविष्य उज्वल, सुजलाम, सुफलाम करण्याची प्रचंड क्षमता असणारे, देशालाच देव मानून, भारत मातेची सेवा करणारे देशाचे लोकहितवादी खरे सुपुत्र आहेत या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने भोरमधील पदाधिकाऱ्यांने गौरवोद्गार काढले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून रुग्णांना फळे वाटप करताना रुग्णांची विचारपूस करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.