Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

निराः प्रविण जोशी यांच्या ‘पनव्या’ कादंबरीचे प्रकाशन; संवेदना बोथट होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे; डॉ. संदीप सांगळे यांचे मत

by SBPRNL
November 8, 2024
निराः प्रविण जोशी यांच्या ‘पनव्या’ कादंबरीचे प्रकाशन; संवेदना बोथट होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे; डॉ. संदीप सांगळे यांचे मत

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे 

प्रविण जोशी यांची ‘पनव्या’ कादंबरी हा मैलाचा दगड ठरेल. नंदीवाल्या समाजाची बोलीभाषा व भटक्या जमातीचा संघर्ष दाखवणारी ही कादंबरी अस्वस्थ करून सोडते. ज्या समाजाच्या संवेदना जागृत आहेत त्या समाजात समतेसाठी, दुःख निर्मूलनासाठी प्रयत्न होतात आणि ते राष्ट्र प्रगती करते. परंतु, भौतिक संपन्नता संवेदना बोथट करत असेल तर हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अस्वस्थ आणि वेडं झाल्याशिवाय समाजाला दिशा देता येत नाही, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी केले. नीरा (ता. पुरंदर ) येथील ग्रामपंचायत सभागृहात प्रसिद्ध ग्रामीण लेखक व कवी प्रविण जोशी यांच्या पनव्या या कादंबरीचे प्रकाशन डॉ. सांगळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. सांगळे म्हणाले, समाजात आहे रे वर्गाने नाही रे वर्गाच्या कल्याणासाठी झटले पाहिजे. तरच सामाजिक समातेचे तत्व वृद्धिंगत होईल. आपण भारतीय म्हणून हे आपले कर्तव्य आहे. भटक्या जमातीतील नंदीबैल घेऊन फिरणाऱ्या जमातीतील स्त्री जीवनाचे चित्रण लेखकाने बरकाईने व अभ्यासपूर्ण केले आहे. यावेळी दादासाहेब गायकवाड म्हणाले. या जमातीचे प्रश्न जोशी यांनी मांडले आहेत. पण, ते सोडविण्याची जबाबदारी आपली आहे. ओळखपत्र, घरांना जागा व त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. महादेव रोकडे, कवयित्री रुपाली फरांदे, गिरीश भांडवलकर, कांचन निगडे, राजेंद्र बरकडे, दादासाहेब गायकवाड, बाळासाहेब ननावरे, अमृता निगडे, पी. डी. कांबळे आदी उपस्थित होते. कांचन निगडे, राहुल शिंदे, केशव गोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्रा. कुंडलिक कदम होते. आभार प्रविण जोशी यांनी मानले.

प्रविण जोशी हा जातीने ब्राम्हण असला तरी कर्माने बहुजन आहे. भटक्या जमातींशी एकरूप झालेला हा लेखक, कवी जातीवादाला कडाडून विरोध करतो. समतेचा संदेश देतो, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमातीतील देऊळवाले, नंदीवाले, मसनजोगी यांच्या कल्याणासाठी झटणारा हा आधुनिक कर्मयोगी आहे.

– डॉ. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय)

कादंबरी दर्जेदार असून तिचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. या कादंबरीने या जमातीची बोली प्रथमच साहित्यात आली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर झालेले या कादंबरीचे प्रकाशन ही अमूल्य भेट आहे.

– प्रा. कुंडलिक कदम( महाराष्ट्र साहित्य परिषद पदाधिकारी)

Tags: niraPunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
गावभेट दौराः संधी दिल्यास मतदार संघाला वेगळ्या उंचीवर नेणारः शंकर मांडेकर यांची मतदारांना आर्त हाक; दुर्लक्ष केल्यामुळेच मतदार संघात मूलभूत सुविधांचा अभावः मांडेकर

गावभेट दौराः संधी दिल्यास मतदार संघाला वेगळ्या उंचीवर नेणारः शंकर मांडेकर यांची मतदारांना आर्त हाक; दुर्लक्ष केल्यामुळेच मतदार संघात मूलभूत सुविधांचा अभावः मांडेकर

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group