फार्मासिस्ट औषधे विक्रेते नसुन समाजाचे आरोग्य मित्र
२५ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने भोर तालुका केमिस्ट फार्मासिस्ट असोसिएशन तर्फे बुधवार (दि.२५) हा दिवस जागतिक फार्मासिस्ट म्हणून भोर शहरातील वनवासी कल्याण आश्रमाला व मूकबधिर विद्यालयाला भेट देऊन एक हात मदतीचा पुढे करत साजरा करण्यात आला.
डॉक्टर आणि पेशंट यांना जोडणारा मधला दुवा म्हणजे फार्मासिस्ट म्हणजे औषध विक्रेता आहे. हे औषध विक्रेते आरोग्य व्यवस्थेतील महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आरोग्य मित्र देखील संबोधले जाते.हे फार्मासिस्ट -आरोग्य मित्र समाजामध्ये लोकांना औषधं तयार करण्यापासून ते रुग्णांना औषध कधी, कसे, का घ्यायचे , औषधाचे सर्व फायदे ,तोटे, नुकसान याबद्दलची सर्व माहिती देत समजावून सांगत असतात. गरजूंना मदत करण्यात त्यांना नेहमी आनंद वाटतो. आपण आरोग्य सेवेतील हे एक महत्त्वाचा भाग असल्याने आपण या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी या दिनाचे औचित्य साधून भोर शहरातील वनवासी कल्याण आश्रम येथे भोजनासाठीची आवश्यक साधनसामग्री कडधान्ये, डाळी, मसाले ,असे दैनंदिन लागणारे किराणा साहित्याचे वाटप त्यांच्याकडून करण्यात आले. तसेच शहरातील मूकबधिर विद्यालय रथखाना येथे आरोग्यदायी फळे वाटप करण्यात आलीत. या्वेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भारावून गेल्याचे अध्यक्ष सागर सोंडकर यांनी सांगितले.
या वेळी वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी डॉ उदय जोशी यांनी उपास्थित फार्मासिस्ट यांचा सत्कार केला आणि फार्मासिस्ट हे नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत असतात म्हणून त्यांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी केमिस्ट फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर सोंडकर, उपाध्यक्ष धीरज जेधे, सचिव विशाल भांडे , खजिनदार गणेश दरेकर, जेष्ठ रविंद्र हर्णसकर, दत्तात्रय म्हस्के,प्रियंका भेलके, निर्मला सपकाळ, राहुल चौधरी, मंदार साडेकर, सागर वाडकर ,पप्पू खोपडे, संतोष कदम हे फार्मासिस्ट औषध विक्रेते उपस्थित होते.