Saturday, October 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

by SBPRNL
May 8, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

Oplus_16908288

भोर : गोगलवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील तीन प्रमुख वहीवाटीचे रस्ते काही शेतकऱ्यांकडून बंद करण्यात आल्याच्या विरोधात 6 मे पासून उपोषण सुरु केले आहे. सदर रस्ते पूर्वीपासून सार्वजनिक वापरात असून त्याबाबत पूर्वी दिलेले तीन वेगवेगळे निर्णय रस्ते खुल्या ठेवण्याचेच आहेत. मात्र अलीकडे हवेली प्रांताधिकाऱ्यांनी याच प्रकरणात रस्ता बंद करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने निर्णय दिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाला संशयित ठरवले असून त्याची चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. “आमच्या मागण्या सरकार दरबारी वारंवार मांडल्या असून केवळ आश्वासनाशिवाय काहीच ठोस कृती झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाची रोजच्या शेतीकामांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. रस्ते बंद असल्यामुळे शेतीमाल वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नाहीत, परिणामी आर्थिक नुकसानही होत आहे,” असे मत ग्रामस्थांनी मांडले.

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

या संदर्भात माजी सरपंच अशोक गोगावले यांनी सांगितले की, “शुक्रवारपर्यंत शासनाने रस्ते खुल्या करण्याबाबत ठोस निर्णय अथवा खात्रीशीर आश्वासन द्यावे. अन्यथा आम्ही गावाचा मुख्य रस्ता बंद करून आमरण उपोषण करण्यास भाग पडू.”

ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि गावकरी या आंदोलनात सहभागी असून त्यांच्या या लढ्यात महिलांचाही मोठा सहभाग आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने गावात असंतोषाचे वातावरण आहे.

सदर प्रकरणात शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. अन्यथा गोगलवाडीतील आंदोलन अधिक तीव्र होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post

Bhor News - येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group