कलानगरीः नुकताच रानडी नावाचा मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमांमध्ये अॅक्शनपटांना सुगीचा काळ होता का, असा प्रश्न रानटी सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मनात येतो. रानटी हा मराठीतील बिग बजेट अॅक्शनपट आहे. पुनीत बालन यांनी सिनेमाची निर्मिती केली असून, सिनेमाचे दिग्दर्शन सुमित कक्कड यांनी केले आहे. अभिनेता शरद केळकर हा मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबतने अभिनेता संजय नार्वेकर, संतोष जुवेकर आदी कलाकार आहेत. विष्णू नावाचे पात्र अभिनेता शरद केळकरने साकारलेले आहे. विष्णूचा नृरसिंह असा प्रवास या पात्रांचा सिनेमात पाहिला मिळणार आहे.
पातालपूर नामक गावात संपूर्ण कथानक घडताना दाखविण्यात आले आहे. अॅमेझान प्राईमवर आलेली पाताललोक नामक सिरीजशी साधार्म्य असणारी स्टोरी सिनेमात दाखविण्यात आल्याची शक्यता ट्रेलरमधून जाणवताना दिसते. सिनेमात अॅक्शन मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आली आहे. क्राईम बेस सिनेमा असण्याची दाट शक्यता दिसत आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी रानटी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामुळे मराठीत प्रथमच अनेक वर्षांपासून अॅक्शनपट सिनेमांची कमी होती. ती कमी रानटी भरून काढतो का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. यासोबतच पुनीत बालन यांची निर्मीती असणारा जग्गु जुलीयेट हा सिनेमा फार काही कमाल करू शकला नाही. त्याची कसर रानटी भरून काढणार का, यासाठी २७ नोव्हेंबरची वाट पाहवी लागेल.