भोर- तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांच्या गाव भेटी दौरे व मतदार कार्यकर्ते गाठीभेटी सुरू झाले आहेत. यातच वेळवंड खोऱ्यात हळूहळू राष्ट्रवादी पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाले असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोर राजगड मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या सहकार्यातून व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन भोर तालुक्यातील पांगारी नानावळे गावातील विद्यमान सरपंच विठ्ठल बाबू शिंदे, ग्रा पं सदस्य निलेश ज्ञानेश्वर मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र विष्णु मोरे , सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिवराम मोरे , कुणाल नथू मोरे, विलास तुकाराम लाळे , बाप्पू बबन मोरे, तुकाराम लक्ष्मण दूरकर यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी रणजीत शिवतरे ,अमोल नलवडे, किरण राऊत, प्रवीण जगदाळे, सर्जेराव बोडके ,माऊली खुटवड, सचिन बोरले , मोहन बोरले, तानाजी चंदनशिव, गणेश आवाळे , संदीप दूरकर , राजेश राजंणे , नवनाथ राजिवडे ,पप्पू मिरकुटे उपस्थित होते. प्रवेश केलेल्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार मांडेकरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषदेसाठी भोलावडे- शिंद गटात सर्वसाधारण आरक्षण व पंचायत समितीसाठी भोलावडे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग व शिंद गणात सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार सध्या सोशल मीडिया मार्फत आपापले पोस्ट व्हायरल करून आपणच प्रबळ दावेदार असल्याचे दाखवत आहेत. या गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी खरी लढत राष्ट्रवादीचे घड्याळ व भाजपचे कमळ यांच्यातच होणार असून यामध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये प्रवीण जगदाळे, विठ्ठल आवाळे, शंकर कडू, मानसिंगबाबा धुमाळ यांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे तसेच पंचायत समितीसाठी भोलावडे गणात सर्जेराव बोडके, राजेश बोडके,अक्षय चव्हाण तर शिंद गणात मनिषा राहुल पारठे, अर्चना अरूण राजीवडे यांची नावे समोर आली आहेत

















