भोर: भोर तालुक्यात काल रात्री वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सागवान आणि रायवळ यांसारख्या दुर्मिळ झाडांची तस्करी करणाऱ्या दोन आशियार ट्रक कारवाईमध्ये जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान आणि रायवळ लाकूड साठवले होते. या लाकडाची अंदाजे किंमत अनेक लाखांच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने पुढील तपास सुरू केला असून, तस्करीमध्ये संलग्न असलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरू आहे.
तस्करीत बड्या नेत्याचा हात?
सूत्रांच्या महितीनुसार, जप्त करण्यात आलेले दोन्ही ट्रक तालुक्यातील एका बड्या नेत्याच्या मालकीचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे या प्रकरणात राजकीय रंग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने या प्रकरणी पुढील तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
झाडांची बेकादेशीरपणे कत्तल
सदर प्रकरण हे फक्त लाकूड तस्करीपुरते मर्यादित नसून, पर्यावरणावर होणारा गंभीर धोका दर्शवते. सागवान आणि रायवळ ही दुर्मिळ आणि बहुमूल्य झाडे असून यांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे. हे पर्यावरणासाठी धोकादायक आहे. या प्रकरणातून स्पष्ट होते की, अजूनही अनेक ठिकाणी अशा प्रकारची तस्करी सुरू असण्याची शक्यता नाकारता येत आहे.
या कारवाईत वनविभागाने दोन्ही ट्रक जप्त केले असून, हे एक चांगले उदाहरण म्हणून याकडे पाहिला हवे. मात्र, या प्रकरणातील खरे दोषी कोण आहेत, याचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी वनविभागाला अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.