भोर : मागील दोन दिवसापासून भोर तालुक्यात अवकाळी मुसळधार पावसाने थैमान घातले असून आज मंगळवार (दि.२४) दुपारनंतर आलेल्या मुसळधार पावसाने भोरकरांना झोडपून काढले. मंगळवारचा दिवस आठवडे बाजार असल्याने तालुक्यातील व इतर आजूबाजूच्या परिसरातील आलेल्या लोकांची यावेळेस मोठी गर्दी असते आज आलेल्या मोठ्या मुसळधार पावसाने नागरिकांचे दैना उडवली असून तरकारी भाजीपाला व्यावसायिकांची देखील तारांबळ उडाली.सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असून भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
सध्या हत्ती नक्षत्र सुरू असुन या नक्षत्राला मोठा मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जोमाने आलेली भात पीके , दाणेदारपणेबाहेर पडत आहेत परंतु असा जोराच्या मा-याचा मुसळधार पाऊस ही भात पीके आडवे करत आहे त्यामुळे हातात तोंडाशी आलेले पीकांचे मोठे नुकसान होत आहे.सोयाबीन या पीकाचे देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे . यापूर्वी झालेल्या अशाच मुसळधार पावसाने घेवडा, चवळी,उडीद अशा कडधान्ये पीकांबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे.