भोर तालुक्यातील महुडे खो-यातील शेतकऱ्यांना वारंवार पाण्याचा प्रश्न भेडसावत होता याचाच विचार करून भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी आपल्या विशेष प्रयत्नातुन भोर तालुक्यातील महुडे खुर्द येथे निरा देवघर डावा कालवा वितरण व्यवस्था करणे या योजनेचा रक्कम रू.२८ कोटी ४७ लक्ष ५८ हजार रु. निधी मंजूर करून या योजनेच्या कामाचे भूमिपूजन महुडे खुर्द येथे रविवार (दि.४)करण्यात आले. या योजनेचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार असून येथील लोकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असुन अनेकांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे . तसेच यातुन रोजगाराच्या मोठ्या संधी देखील उपलब्ध होणार आहे व याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
तसेच त्यांनी अनेक निष्ठावंतांना पक्षाच्या नवीन पदभार नियुक्तीचे पत्र देत त्यांचा सन्मान केला.यामध्ये भोर तालुका काँग्रेसच्या सरचिटणीसपदी रामचंद्र कुमकर, युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विनायक पवार, प्रशांत दामगुडे, सरचिटणीसपदी शंकर दामगुडे, ओ.बी.सी.सेलच्या उपाध्यक्षपदी सूर्यकांत आखाडे, सोशल मिडिया सेलच्या उपाध्यक्षपदी अक्षय खोपडे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गितांजली शेटे,भोर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दामगुडे,निरा देवघर डावा कालवा समितीचे अध्यक्ष बबन खाटपे, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अतुल किंद्रे, व्हा.चेअरमन अतुल शेडगे,संचालक सुरेश राजीवडे, दिपक गायकवाड, नथुबुवा दामगुडे,भोर तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष संजय मळेकर, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अंकुश खंडाळे,संचालक विनोद खुटवड, महुडेच्या विद्यमान सरपंच सोनाली दिपक कुमकर, उपसरपंच सचिन कुमकर यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच ,ग्रामस्थ ,महिला, निरा देवघर डावा कालवा समितीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, महुडे येथील ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.