कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर करीत निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, महायुतीचे जागा वाटप जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत महायुतीची पत्रकार परिषद पार पडली असून, या पत्रकार परिषदेतून जागावाटपाची माहिती देण्यात आली नाही. उलट राज्य सरकारने गेल्या २ वर्षांमध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा सांगणारे रिपोर्टकार्डचे उद्घाटन या पत्रकार परिषदेत करण्यात आले केले. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी महायुतीचे नेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधाने
- लाडकी बहिणी योजना बंद करण्यासाठी काँगेस पक्षातील नेते कोर्टात
- त्यांनी आरसा पाहवा
- ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आम्हाला शिकवतात
- पैसे घेऊन बदल्या केल्या
- निर्भया पथकाच्या गाड्या नेत्यांसाठी वापरण्यात आल्या
- हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला कंम्पिसेशन आम्ही दिले
- नॅरेटिव्ह तयार करण्याचा हा केवलवाणा प्रयत्न
उपमुख्यमंत्री अजित पवार
- महायुतीच्या निर्णयांमुळे विरोधक गडबडले
- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालूच राहणार
- त्यासाठी ४५ हजार कोंटीची वर्षभरासाठी तरतूद
- सातत्याने विरोधक टीका करत आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- रिपोर्टकार्ड सादर करायला हिंमत लागते.
- इन्फ्रा प्रकल्प विकासाला गती देणारे
- महाविकास आघाडीने अडीच वर्षांत प्रकल्प बंद पाडण्याचे काम
- खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं
- विकास, उद्योगधंदे आणि कल्याणकारी योजना, त्यामुळे त्यांचे अवसान गळाले आहे
- विरोधक उलटसुलट आरोप करीत आहेत, ते गोंधळलेले आहेत.
- ते सीएम करताहेत आम्ही लोकांसाठी काम काम करतो
या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला. यामध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयांचे माहिती, प्रकल्प आदी बाबतीची माहिती दिली. तसेच विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर अधिक भर दिसून आला. शासन आपल्या दारीमधून ५ कोटी नागरिकांना लाभ मिळाला असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.