जिल्हा क्रिडा परिषद, पुणे यांच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नारायणपूर येथील राजगड ज्ञानपीठ भोर संचलित, सद्गुरू श्री नारायण महाराज माध्यमिक विद्यालयाने सद्गुरु श्री अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला. पुरंदर हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य सय्यद इस्माईलसर , पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कारकरसर, क्रिडा शिक्षक झेंडेसर यांनी अंतिम सामना संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यालयातील मुलींनी उत्कृष्ट खेळ सादर करून राजगड ज्ञानपीठाचा गौरव वाढविला.त्यांच्या या यशामध्ये मार्गदर्शक मुख्याध्यापक राम चौगुले,शिक्षक घोळवेसर सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान राहिले. या विजयामुळे विद्यालयाचे नाव संपूर्ण तालुक्यात उज्ज्वल झाले असून शालेय परिवार, पालक, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांकडून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजगड ज्ञानपीठ,भोर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे,उपाध्यक्ष पृथ्वीराज थोपटे, सचिवा स्वरूपाताई थोपटे व संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी रामचंद्र थोपटे यांनी खेळाडूंना आशीर्वाद देत पुढील पातळीवरही उत्तुंग कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नारायणपूर,पेठ,पोखर व चिव्हेवाडी पंचक्रोशीतील मान्यवर भरतनाना क्षीरसागर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदाशिव बोरकर,सरपंच प्रदीपबापू बोरकर, सामाजिक कार्यकर्ते रामतात्या बोरकर माजी सरपंच चंद्रकांत बोरकर, सोपान बोरकर व समस्त ग्रामस्थांनी यांनी मुलींच्या या यशाचा मनापासून गौरव केला आहे. टेंभे स्वामी यांनी मुलींना आशीर्वाद दित शुभेच्छा दिल्या. नारायणपूरच्या कन्यांनी दाखवून दिले की, जिद्द, मेहनत व एकजुटीच्या जोरावर कोणतेही शिखर गाठता येते.