शिक्रापूर/शेरखान शेख
कान्हूर मेसाई येथील पुंडे लवण येथे एक मोर विजेच्या तारेला धडकून जमिनीवर पडल्याचे नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती वनपाल गणेश पवार यांना मिळताच वनरक्षक नारायण राठोड, वनमजूर हनुमंत कारकुड, रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, शुभम वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
यावेळी वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे तीन वर्षे वयाचा नर प्रजातीचा मोर विजेच्या धक्क्याने मृत पावल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत सदस्या सुरेखा पुंडे, प्रज्योत पुंडे, ओंकार पुंडे, प्रफुल्ल पंडे, आयुब शेख यांसह आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, वनविभागाच्या वतीने मृत मोराला ताब्यात घेत त्याचे शवविच्छेदन करत शासकीय जागेमध्ये दहन करण्यात आले आहे.