कळमनुरीः या विधानसभा क्षेत्रातील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये मतदारांना आणण्यासाठी फोन पे करून पैसे पाठवतो, असे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी निवडणूक आयोगाने आमदार संतोष बांगर यांना नोटीस बजावली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याची व्हिडिओची तपासणी केल्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेवरून गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार आमदार संतोष बांगर यांच्या विरोधामध्ये कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ प्रसारित झाला असून, आमदार बांगर काही लोकांच्या कानशिनाल लगताना दिसत आहे.
सदर व्हिडिओ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या अयोध्या पोळ यांनी एक्स या समाज माध्यमावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये येथील हिवरा जाटू गावातील काही लोकांशी आमदार बांगर हुजत घालताना दिसत असून, एका व्यक्तीच्या कानशिलात लगाविताना दिसत आहे. पोळ यांनी सदर व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केली असून, कार्यकर्त्याला मंदिराचा हिशोब का मागता म्हणून आदर्श शिक्षक शिंदे सर व गावातील मंदीर कमिटीच्या कारभारी मंडळीला आमदार संतोष बांगर यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
..@OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @mieknathshinde @Dev_Fadnavis @Shivsenaofc @BJP4Maharashtra https://t.co/bMb0xy9eiE
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) October 22, 2024