Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जेजुरीः शरदचंद्र पवार महाविद्यालयास नॅककडून ‘बी’ श्रेणीचा दर्जा

त्यांनी सुचवलेल्या त्रुटी दूर करून भविष्यात महाविद्यालय अधिक सक्षमपणे काम करेलः विजय कोलते

by SBPRNL
October 22, 2024
जेजुरीः शरदचंद्र पवार महाविद्यालयास नॅककडून ‘बी’ श्रेणीचा दर्जा

जेजुरी: विजयकुमार हरिश्चंद्रे

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान चालवित असलेले जेजुरीचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय सभोवतालच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, संशोधन आणि राजकीय बदलाचे केंद्र बनेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केला. निमित्त होते नुकतेच बंगळूर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कडून महाविद्यालयाचे मूल्यांकन झाले. या मूल्यांकनाच्या आधारे नॅककडून महाविद्यालयाला ‘ब’ दर्जा देण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या महाविद्यालयीन कर्मचारी गौरव समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, सहसचिव बंडू काका जगताप, प्राचार्य डॉ. धनाजी नागणे, नॅक समन्वयक डॉ. बालाजी नाटकरे, उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते, सहसचिव गौरव कोलते, प्रा. डॉ. अरुण कोळेकर आदी उपस्थित होते. नुकतीच नॅक पीअर टीमने महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यामध्ये अध्यक्ष डॉ. थारकेश्वर व्ही. बी. (तेलंगणा), समन्वय सदस्य डॉ. अश्विनी पुरोहित (गुजरात), सदस्य डॉ. नलप्पण रमण (तामिळनाडू) यांचा समावेश होता. त्यांनी नॅकच्या क्रायरेटरीयाच्या आधारे प्रत्यक्ष पाहणी करून मूल्यमापन केले. त्या आधारे नॅककडून विद्यालयास ‘बी’ दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे.

कार्यक्रमात बोलताना विजय कोलते पुढे म्हणाले, नॅकने दिलेल्या ब श्रेणीमुळे आम्हांला आनंद झाला आहे. त्याबद्दल त्यांनी नॅक आणि पिअर टीमचे आभार मानले. त्यांनी सुचवलेल्या त्रुटी दूर करून भविष्यात महाविद्यालय अधिक सक्षमपणे काम करेल असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. डॉ. धनाजी नागणे, डॉ. बालाजी नाटकरे, उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते यांचा सत्कार विजय कोलते यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक आणि प्रशंसा केली.

प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाने या काळात विद्यार्थांसाठी केलेल्या सुविधांचा, शैक्षणिक आणि सहशिक्षण कार्यासंबंधीचा आढावा घेतला. नॅकने केलेल्या सकारात्मक गुणांचा आणि भविष्यातील दिशेचा त्यांनी अहवालातून सविस्तर माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक इत्यादी घटकांनी केलेल्या सहकार्यामुळे महाविद्यालय ब श्रेणी प्राप्त करु शकले असे त्यांनी सांगितले.

प्रस्ताविकाच्या रूपाने डॉ. बालाजी नाटकरे यांनी समन्वयक म्हणून केलेल्या कामकाजा संदर्भात आणि मिळालेल्या श्रेणीबद्दल माहिती दिली. संस्थेचे सहसचिव बंडू काका जगताप, गौरव कोलते यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी केले. याप्रसंगी प्रा.डॉ. राजकुमार रिकामे, प्रा. कल्पना रोकडे ,प्रा. राजेंद्र कोल्हे ,प्रा.पोपट झोंबाडे, प्रा. महेश गावडे, प्रा. गौरी फडतरे, प्रा.पूनम कुदळे, प्रा. नेत्राली काकडे, बाळकृष्ण मोकाशी, आकाश चाचर, सुरेश खरात, श्याम पवार, सुरेखा जगताप, सिताराम भोकटे, विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: jejuripurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
कळमनुरीः आमदार संतोष बांगरांनी लगावली दोघांच्या कानशिलात, घटनेचा व्हिडिओ आला समोर, कार्यकर्त्याला मंदिराचा हिशोब का मागता म्हणून केली मारहाण ?

कळमनुरीः आमदार संतोष बांगरांनी लगावली दोघांच्या कानशिलात, घटनेचा व्हिडिओ आला समोर, कार्यकर्त्याला मंदिराचा हिशोब का मागता म्हणून केली मारहाण ?

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group