नसरापूर : येथील नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाला नॅककडून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मा. पोपटराव सुके यांनी दिली.
नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाची नुकतीच नॅक तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली, महाविद्यालयातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, नियोक्ता यांची महाविद्यालयाच्या संबंधी मते जाणून घेण्यात आली. महाविद्यालयातील उपलब्ध उपकरणे, मशिनरी, बस सुविधा, होस्टेल सुविधा, शैक्षणिक मूल्यमापन, महाविद्यालयात राबविण्यात येणारी समाज उपयोगी उपक्रमे या संबंधी माहिती समितीने घेतली.
नॅकच्या पहिल्याच सायकल मध्ये ही उच्च श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. या सर्व वाटचालीमध्ये साथ देऊन वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके, उपाध्यक्षा सायली सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, विश्वस्त नाना सुके, सचिव गोरख सुके या सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. किशोर ओतारी, IQAC समन्वयक डॉ. प्रिती मेहता तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आभार मानले.
विद्यार्थी केंद्रबिंदू
विद्यार्थी घटक महाविद्यालयाच्या केंद्रबिंदू असला आणि यासाठी दर्जेदार शैक्षणिक व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध आहे. संस्था यापुढेही विद्यार्थीभिमुख कार्य करत राहिल. महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा मिळाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाविद्यालयामध्ये संशोधन पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. असे मत अध्यक्ष पोपटराव सुके यांनी व्यक्त केले.