भारताच्या नैऋत्य भागातून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याने सोमवारी ही माहिती दिली. यावेळी मान्सूनची माघार नेहमीपेक्षा आठ दिवस उशिराने सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्वी त्याची कटऑफ तारीख १७ सप्टेंबर मानली जात होती आणि १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून भारतातून पूर्णपणे परत जातो. हवामान खात्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, राजस्थानच्या नैऋत्य भागातून नैऋत्य मान्सूनची माघार आज पूर्ण झाली आहे. साधारणपणे १७ सप्टेंबरपर्यंत मान्सून या प्रदेशातून माघार घेतो.
मान्सून उशिरा माघारीचा परिणाम काय?
हे लागोपाठ १३ वे वर्ष आहे जेव्हा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू करण्यास उशीर झाला आहे. नियोजित वेळेच्या तुलनेत मान्सूनची माघार लांबली असून उत्तर-पश्चिम भारतातून मान्सून उशीरा माघारी फिरल्याने भारतीय उपखंडात घेतल्या जाणाऱ्या पिकांवरही याचा परिणाम होतो, कारण मान्सून उशीरा परत फिरल्याने देशात पावसाळाही लांबतो, ज्याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. विशेषतः उत्तर-पश्चिम भारतात, जिथे मान्सून रब्बी पिकांच्या वाढीमझ्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.