पारगांवः धनाजी ताकवणे
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील टेंभेकरवस्ती येथे घराच्या अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला करत उचलून नेले. या घटनेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि हृदय पिळवटूण टाकणारी घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेने गावांतील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.
मांडवगण भागातच महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडली असल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिवतेज टेंभेकर (वय. ४) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
यानंतर स्थानिकांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर मुलाला शोधण्यात यश आले. पण मुलावर गंभीर हल्ला झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या चिमुकल्याला बिबट्याने अक्षरशः काळीज पिळवटूण टाकण्यासारखं भयानक अवस्थेत मृत्यूमुखी पाडले.
घटेनेने वन विभागाच्या कामकाजावर संतापजनक वातावरण प्रतिक्रिया उमटत आह. घटना घडल्यानंतर सुमारे एका तासाने वनविभाग जागे झाला. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचेही परिसरातून बोलले जात आहे. तर वनविभागाचे अधिकारी दाखल होताच स्थानिकांनी त्यांना घेराव घालत होता. दरम्यान ही घटना घडल्यानंतर या भागात वीज नव्हती. ज्या ठिकाणी घटना घडली तेथे विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.