भोरः महाड-पंढरपूर राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला वेग प्राप्त झाला असून, भोर तालुक्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली आहे. या रस्त्याचे काम हिर्डोशी भागात सुरू असल्याचे दिसत आहे. भोर तालुक्यातील वरंधा घाट ते शिंदेवाडी फाटा (ता. खंडाळा जि. सातारा) या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७२३ कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामला भोर शहराच्या महाड नाक्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम वेणुपुरी, कोंढरी, हिर्डोशी, वारवंड, शिरगाव हद्दीत वेगवान गतीने सुरू आहे. या रस्त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर बनणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्त्याच्या साईटपट्याचे रुदीकरण, रस्त्या शेजारील डोंंगर खोदाई, नविन मोर्या टाकणे, संरक्षक भिंती बांधणे. वेणुपुरी हद्दीत एका बाजूची साईडपट्टी खोदून भरावा करण्याचे काम केले जात आहे. तसेच मोर्यांसाठीचे खोदकाम करण्यात येत आहे. वेपुपुरी ते कोंढाळकरवाडी हद्दी दरम्यान दोन्ही बाजूंचे खोदकाम केल्याने दुहेरी वाहतुकीला अडचण होत आहे. कोंढरी हद्दीत एका बाजूची साईटपट्टी खोदली असून मोरीचे काम व संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. हिर्डोशी हद्दीतील मोरी खोदकामासह दगडी डोंगर फोडले जात आहेत. तर वारवंड हद्दीत संरक्षक भिंतीसह डोंगर फोडण्याचे काम होत आहे.
स्थानिकांच्या तक्रारीचा प्राधान्याने विचार
सुरु असलेल्या कामातील संरक्षक भिंतीबाबत स्थानिक नागरिकांकडून पाणी मारत नसल्याच्या तक्रारी येत असताना यावर स्थानिकांच्या सूचनांचा प्राधान्याचे विचार करण्यात येत असल्याचे ठेकेदारांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले आहे.
पावसामुळे जास्तीत जास्त काम हिर्डोशी भागात
हिर्डोशी खोर्यात पावसाचे प्रमाण जास्त असून या भागात पावसात काम करताना अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेने प्रथमता याच भागातील कामास सुरुवात करण्यात आली आहे. जास्तीत जास्त काम याच भागात होणार असल्याचे सुरु असलेल्या कामावरून दिसून येते आहे.
दर्जेदार कामाची मागणी
हिर्डोशी भागात सुरू असलेले काम दर्जेदार व्हावे. तसेच अपघात टाळण्यासाठी जागोजागी सूचना फलक लावण्यात यावेत. माती असलेल्या ठिकाणी धुरळा उडत असल्याने पाणी मारण्यात यावे अशी स्थानिक नागरीकांकडून मागणी करण्यात येत आहे.