भोरः भोर विधानसभेचा निकाल अनपेक्षित लागला असून, येथील मतदार राजाने परिवर्तनाला साथ दिली आहे. महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना मोठे मताधिक्क देत विजयी केले आहे. २० नोव्हेंबरनंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीला असल्याने उत्सकुता शिगेला पोहचली होती. या मतदार संघातून कोण निवडून येणार याचे ठोकताळे बांधता येत नव्हते. अखेर या मतदार संघातून राष्ट्रवादीचे पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर यांना संधी दिली आहे. तब्बल १५ वर्षानंतर ही जागा महायुतीच्या ताब्यात गेली आहे. मांडेकर यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांकडून विजयउत्सह साजरा करण्यात येत आहे.
या मतदार संघात निवडणुकीत अनेक मुद्दे तापलेले होते. त्या मुद्यांवरच इथली निवडणूक झाली. यात प्रामुख्याने भोर एमआडीसी, साखर कारखाना, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्नांचा समावेश होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सरासरी ६४ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र ६८ टक्के मतदान झाले. सरासरी ४ ते ५ टक्क्यांची मतवाढ येथे झाली होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मतदार संघातील भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील मतदार परिवर्तनाच्या लाटेवार स्वार होत परिवर्तन घडवले आहे. यामध्ये लाडकी बहिणी गेमचेंजर ठरल्या आहेत.
या मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भोर एमआयडीसीचा, साखर कारखाना आदी प्रश्न आता मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शंकर मांडेकर (आमदार भोर विधानसभा)