भोरः भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात मोठ्या उत्साही वातावरणात मतदानाचा हक्क मतदारांनी बजाविला. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली होती. मात्र दुपार नंतरच खऱ्या अर्थाने मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. भोर २०३ विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६८.०१ टक्के एवढे एकूण मतदान झाले. यामध्ये २ लाख ९२ हजार ६४९ मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार १ लाख ५७ हजार ५१९ तर १ लाख ३५ हजार १२७ मतदारांनी मतदान केले. तसेच इतर ३ मतदारांनी देखील मतदानाचा हक्क बजाविला. त्यानुसार भोर विधानसभा मतदार संघात ६८.०१ टक्के एवढे एकूण मतदान झाले. मागच्या पंचवार्षिक पेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत काही अंशी वाढ झाली आहे.
भोर विधानसभा मतदार संघ मोठा चर्चेचा बनला होता. दोन उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यानुसार येथे चौरंगी लढत झाली. चार उमदेवारांनी मतदार संघ पिंजून काढत प्रचार यंत्रणा राबविली होती. येथील एका मतदान केंद्रांवर वीज खंडीत होण्याचा प्रकार घडला. सर्वत्र शांततापूर्व वातावरण मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी ३ वाजेताच्यानंतर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. सायंकाळी ५ वाजल्याच्यानंतर अनेक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याच्या पाहिला मिळाल्या. परिणामी रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. या मतदार संघातील दुर्गम भागातील मतदारांनी मतदानात उस्फुर्तपणे सहभागी होत मतदान केले. या ठिकाणीचे मतदार हे कामानिमित्त बाहेरगावाहून येथे मतदान करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागला. नवमतदारांनी देखील मतदानाचा हक्क बजाविला. यामुळे आता २३ नोव्हेंबरलाच भोर विधानसभेचा आमदार कोण हे कळणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
203- भोर विधानसभा मतदारसंघ
पुरुष :- 157519
स्त्री :- 135127
इतर :-03
एकूण :- 292649
टक्केवारी :- 68.01%