भोरः राज्यातील निवडणुकीच्या उमेदवारीबाबातचे चित्र पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बंडघोरी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. भोर विधानसभा मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. युतीचे उमेदवार म्हणून शंकर मांडेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तसेच पाच बंडखोरांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. यामळे आता अर्ज माघारीसाठी त्यांची पक्षश्रेष्ठींना मोठी मनधरणी करावी लागणार आहे.
भोर विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून आमदार संग्राम थोपटे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिथे बंडखोरीची शक्ता धुसरच आहे. मात्र, युतीमध्ये अनेकजण नाराज झाल्या असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यातनूच वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. शिवसेना (उबाठा) गटातून इच्छुक असणाऱ्या शंकर मांडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी शिवसेना (उबाठा) गटाची साथ सोडत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळवली आहे.
त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपाला उमेदवारी अर्ज दाखल केला. आयत्यावेळी महायुतीमधून शंकर मांडेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे सलग दोन वेळा काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात लढलेले शिवसेना पक्षाचे कुलदीप कोंडे, तसेच बाळासाहेब चांदेरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रणजित शिवतरे, भारतीय जनता पक्षाचे किरण दगडे पाटील, जीवन कोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. या सर्वांनी देखील जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून हम किसी से कम नही हे दाखवून दिली आहे.
मनधरणी करण्याचे कडवे आव्हान
राजकीय गोठातून मिळालेल्या माहितीनुसार ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा होत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार आल्याने अनेकांना या गोष्टीचे नवल वाटले. तर काहींना मोठा धक्काच बसला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रांगेत असलेल्या अनेकजण या निर्णयामुळे विचारतच पडले होते. ही जागा राष्ट्रवादी अजित पवारा गटाला अशा आयत्यावेळी सोडल्याने उच्च स्तरावरून हालचाल केली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे याचा परिणाम म्हणजे इच्छुकांची मनधरणी करण्यासाठी पक्षनेत्वृवाल प्रयत्न करावे लागणार आहे.